आत्मप्रेरणा पुस्तकास राज्यस्तरीय ललितसाहित्य पुरस्कार

बारामती : बारामती येथील शिक्षक लक्ष्मण जगताप यांच्या आत्मप्रेरणा या प्रेरणादायी पुस्तकास नुकताच सातारा येथील कुंडल -कृष्णाई प्रतिष्ठानचा उत्कृष्ट ललितसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.रोख रक्कम ,स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंतराव जगदाळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
जगताप यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या वर्तमानपत्रात शैक्षणिक ,सामाजिक विषयावर चिंतनपर भरपूर लेखन केले असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त असल्याने पालक व विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
Share a post

0 thoughts on “आत्मप्रेरणा पुस्तकास राज्यस्तरीय ललितसाहित्य पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!