बारामती दि. 11: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोना महामारी मध्ये अनेक बांधवांचे मृत्यू झाले आहेत या महामारी मध्ये अनेक कुटुंब उघडी पडली आहेत समाजाचा घटक म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबा नगर पणदरे तसेच सचिव संभाजी ब्रिगेड पुणे शिवश्री विनोद जगताप व मुख्याध्यापक शिवमती स्वरांजली विनोद जगताप या दांपत्यांनी ज्या मुलांचे पालक कोरोणा महामारी मुळे मृत्यू झालेले असतील अशा मुलांचे दहावीपर्यंत मोफत शिक्षण जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबा नगर येथे केले जाईल हा सामाजिक उपक्रम हाती घेतला म्हणून या सामाजिक कार्याची दखल घेऊन माळेगाव सहकारी साखर कारखाना चे जेष्ठ संचालक श्री सुरेश मामा खलाटे पणदरे गावचे युवा संचालक मंगेश पाटील जगताप तसेच राजेंद्र नाना ढवाण यांनी आमचे बंधू डीडी जगताप यांना फोन करून माळेगाव साखर कारखान्याच्या मीटिंगमध्ये बोलावून माझा त्याठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला यावेळी माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे व्हाईस चेअरमन तानाजी काका कोकरे मदन नाना देवकाते ,स्वप्नील जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप साहेब व इतर संचालक मंडळ उपस्थित होते माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे यांनी हा उपक्रम जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक युवा संचालक योगेश भैय्या जगताप यांनी केले आभार पर भाषणामध्ये शिवश्री विनोद जगताप यांनी माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या सत्कार बद्दल आम्ही भारावून गेलो त्यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन एक शाबासकीची थाप देऊन आमच्या कार्याची उंची वाढू शकते ही आम्हाला जाण करून दिली आणि निश्चितच आम्ही इथून पुढील काळात सुद्धा असे सामाजिक कार्य वाढवत ठेवू अशी ग्वाही दिली
यावेळी रणजित जगताप, निलेश कोकरे, आप्पासो लोखंडे, अभिषेक जगताप मित्र परिवार उपस्थित होता