राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे आवाहन

सातारा दि.11 (जिमाका): दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे.  दि. 1 जून 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in) या वेबसाईटवरील https://nationalawardstoteachers.education.gov.in/new_user.aspx  या लिंकवर नाव नोंदणी सुरु आहे. इच्छूक शिक्षकांनी  20जून 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी  ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!