फलटण : सांगवी ता.फलटण विवीध पीकांच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला किटकनाषके,बुरशीनाषके तसेच जीवाणू संवर्धकांची बिजप्रक्रिया करणे अधिकाधीक उत्पादन घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंडल कृषि अधिकारी,अमोल सपकाळ यांनी केले.
सांगवी ता. फलटण येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र एकनाथ जाधव यांचे शेतावर सोयाबीन बीजप्रक्रिया व सरी वरंबा टोकण पद्दतीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले याचे प्रारंभ प्रसंगी श्री.सपकाळ बोलत होते. यावेळी माजी कृषि विकास अधिकारी,रघुनाथ भोसले,कृषि पर्यवेक्षक अंकुशराव इंगळे,राजेंद्र पालवे, सोनगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदिप पिंगळे, कृषि सहाय्यक योगेश भोंगळे, प्रगतीशील शेतकरी पोपटराव तावरे,विजय जाधव,भालचंद्र तावरे,बाळासाहेब वाघमोडे,जगन्नाथ माने आदि उपस्थीत होते.
यावेळी श्री.सपकाळ पुढे म्हणाले की, बिजप्रक्रिया हि एक कमी खर्चीक बाब असून अवलंब केल्यामुळे पीकाच्या रोपावस्थेतच किड-रोगांचे नियंत्रण व रासायनिक खत मात्रेत बचत होऊन आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्याने जोमदार वाढ होते आणि उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
या प्रसंगी सहाय्यक कृषि अधिकारी,योगेश भोंगळे प्रात्यक्षिकाची माहिती देताना म्हणाले की,सरी वरंबा पद्दतीने ३ ते साडेतीन फुटी सरीवर ९ इंचावर सोयाबीनच्या ३ (तीन) बियांची टोकण सरीच्या दोन्ही बाजूने केल्यास आवश्यक बियाण्यात निम्याच्या वर बचत होऊन पीकाची जोमदार वाढ झाल्याने विक्रमी उत्पादन घेणे सहज शक्य आहे.
सदरची प्रात्यक्षिके बिजप्रक्रिया व जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांच्या मात्रेत १०% बचत तसेच ‘एक गाव एक वाण’ या पद्दतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषि अधिकारी भास्कर कोळेकर,तालुका कृषि अधिकारी सुहास रणसिंग यांच्या मार्ग दर्शनाखाली आयोजित केली असल्याची माहिती कृषि पर्यवेक्षक अंकुश इंगळे यांनी दिली.
*छायाचित्र: सांगवी ता.फलटण बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकावेळी* मंडळ कृषि अधिकारी अमोल सपकाळ, माजी कृषि विकास अधिकारी,रघुनाथ भोसले,कृषि पर्यवेक्षक अंकुशराव इंगळे,राजेंद्र पालवे, कृषि सहाय्यक योगेश भोंगळे,सोनगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदिप पिंगळे,प्रगतीशील शेतकरी पोपटराव तावरे,विजय जाधव,भालचंद्र तावरे,बाळासाहेब वाघमोडे,जगन्नाथ माने आदि