माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर
फलटण दि.८ :
फलटण नगरपरिषदेचे विद्दमान नगरसेवक
आणि शिक्षण समितीचे सभापती
किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर
यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषदेचे
माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक
निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये
दत्तघाट फलटण येथे वृक्षारोपन करण्यात
आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास होत
चाललेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा
होत असलेला हास थांबवण्यासाठी “वृक्ष
लागवड वृक्ष संवर्धन” करणे हि काळाची
गरज आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा
परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे
ना.निंबाळकर यांनी केले. यावेळी
फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष
तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे,
नगरसेवक अजय माळवे, नगरसेविका
प्रगती कापसे, सौ वैशाली चोरमले, सौ
सुवर्णा खानविलकर, ज्योत्स्ना शिरतोडे,
राहुल निंबाळकर, अनिल शिरतोडे, पप्पू
शेख , अभिजित जानकर , सनी शिंदे , पिंटू
तिवाटणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती
होती.