गोखळी( राजेंद्र भागवत यांज कडून) :
पवारवाडी (आसू) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पवारवाडी(आसू) येथील युवकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून आपल्या पूर्वजांनाच्या स्मरणार्थ कोविड सेंटर साठी “एक हात मदतीचा आणि आपल्या कर्तव्याचा या उपक्रमात सहभागी होऊन मदत केली.
पवारवाडी (आसू) येथील रहिवाशी स्वर्गीय धोंडीराम भिवा पवार यांचे स्मरणार्थ ग्रामविकास अधिकारी सुनील धोंडीराम पवार यांनी रुपये १०हजार आणि स्वर्गीय सुभद्राबाई बळीराम अवघडे यांचे स्मरणार्थ ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव बळीराम अवघडे यांनी रुपये १०हजार पवारवाडी येथील सहकार महर्षी स्वर्गीय हणमंतराव पवार(अण्णा) आयसोलेशन सेंटर साठी पूर्व जणांनाच्या स्मरणार्थ आर्थिक मदत करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी श्री.शरद नारायण पवार यांनी दोन हजार रुपये, अशोक सदाशिव माने सर यांनी दोन हजार रुपये यांनी” एक हात मदतीचा आणि कर्तव्याचा “या उपक्रमात सहभागी होऊन मदत केली.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेवराव पवार, डॉ दुर्योधन भोसले, सचिन वरे ,मदन पवार,बाळु हजारे तसेच सरपंच,गावकामगार तलाठी, प्राचार्य, आशा वर्कस, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी विभागीय मंडलाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.