बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
“जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक दिन बारामतीमध्ये उत्साहात साजरा”
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक दिन या निमित्ताने मौजे मळद गाव (भैय्या वस्ती) या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले . पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वड, पिंपळ , कडुलिंब इ. पर्यावरण पूरक वृक्ष लावण्यात आले व वृक्षसंवर्धनाची ही जबाबदारी घेण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मळद गावचे सरपंच श्री. योगेश बनसोडे , उपसरपंच किरण गावडे, मराठा सेवा संघ मा. जिल्हाध्यक्ष दीपक भराटे, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत तावरे, बारामती तालुका अध्यक्ष गोविंद वाघ, शहराध्यक्ष विकास खोत, जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष प्रा. सुषमा जाधव, उपाध्यक्ष शारदा मदने, सचिव शिलाराणी रंधवे, कार्याध्यक्ष विद्याराणी चव्हाण, तालुका संघटक स्मिता देवकाते,
पोलीस मित्र संघटना बारामती अध्यक्ष सुरज तावरे, प्रीतम गुळूमकर, बारामती तालुका सम्यक विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहित भोसले, संचित मदने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी रशिया या देशातून इरीना व प्रेम यादव खास पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आभार प्रा गोविंद वाघ यांनी मानले