फलटण लायनेस क्लबच्या
अध्यक्षा व लायन्स क्लब ऑफ गोल्डनच्या सचिव ला.नीलम विजयकुमार लोंढे-पाटील हे फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नाव कुटुंबाची आस आणि जनसेवेची कास धरून आपण सदैव प्रगतीपथावर करतअसलेले कार्य उल्लेखनीय आहे.लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत असताना आपण जी सामाजिक बांधिलकी जोपासत आहात हे कार्य अतुलनीय व समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी आहे
आपण नेहमी कार्यतत्पर असता आशा वर्कर्स, गरजू महिलांना साडी वाटप, मास्क वाटप, वाफारा मशीन वाटप, ऑक्सीजन मशीन वाटप, पोलीस बांधवांना मेडिकल किट वाटप, तसेच विविध सामाजिक संस्थेला आपण वेळोवेळी मदत करत असता जागतिक कोरोनाच्या महामारीत आपण वेळोवेळी
केलेले विधायक कार्य व उपक्रम निश्चितच खूप प्रेरणादायी आहेत. तसेच शाळेतील मुलांसाठी आपण पाणी फिल्टर मशीन, डिजिटल क्लास ,अंध व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वखर्चाने करत असणारी मदत , वृक्षारोपण इत्यादी कार्य यातून आपल्या दातृत्वाची विशालता दिसून येते
जनसामान्यांसाठी जीवाची परवा न करता आपण करत असलेले कार्य खूप महान आहे. आपण या कार्यामध्ये आपली कन्या एम.बी.बी.एस. झाली आहे. तिलाही कोरोना सारख्या महामारीत हॉस्पिटलमध्ये काम करण्यास रुजू केले आहे हे कार्य मानवतेच्या आणि कर्तृत्वाच्या बाबतीत विशाल आहे.जे कार्य करायचे ते मनापासून करायचे गरजू लोकांसाठी करायचे हे आपले सूत्र जनसामान्य लोकांसाठी खूप आधारदायक आहे.आपल्या कार्याला खूप खूप सलाम
आपल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपणास मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, प्रांतपाल ला.भोजराज नाईक-निंबाळकर,
ला.अर्जुनराव घाडगे,ला.डॉ.व्होरा, ला.मनूभाई पटेल, ला.रतनसी पटेल,ला. सुहास निकम, ला.बापूराव जगताप ला. मंगेशशेठ दोशी, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे इ. मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
👌
Good Job 👍