फलटण दि. ६ :
६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो.स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा “शिवराज्याभिषेक” दिन हा खऱ्या अर्थाने रयतोत्सव! आज पंचायत समिती फलटण येथे सकाळी ९ वा. शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. कोरोनाजन्य परिस्थिती पाहता सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भगव्या स्वराज्यासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले. यावेळेस महाराष्ट्राचे स्फूर्ती गीत व राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पंचायत समिती फलटणच्या उपसभापती मा. रेखाताई खरात, गट विकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी रमेश गबंरे, शिक्षण विस्तारअधिकारी मठपती,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खरात, तसेच विविध खात्यांचे खातेप्रमुख डॉ. पोटे , सुनील गरुड,तवटे, कोळेकर , इंगळे तसेच कार्यालयाचे अधीक्षक सतीश जाधव, जालिंदर शिंदे व सर्व विस्तार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख सावंत, निकाळजे , बागडे मॅडम, समन्वयक कुंभार मॅडम, राऊत मॅडम. उत्कृष्ट गायिका शुभांगी शिंदे ,व विषय शिक्षक खरात यांनी केले. रांगोळी रेखाटन लता दीक्षित,वर्षा राऊत,वैशाली कवितके यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षक गणेश तांबे, दीपक मोरे,अनिल चव्हाण, आनंदा सकाटे,तानाजी ढमाळ,विकास गोडसे इत्यादी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे यांनी केले.