प्रेम व मैत्री वर आधारित मराठी वेबसिरीज ‘लफंडर्स’ लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर
फलटण दि. 03:
प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. अशाच प्रेम व मैत्री वर आधारित असलेली मराठी वेबसिरीज ‘लफंडर्स’ लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर येत आहे. ‘लफंडर्स’चे मुहूर्त नुकतेच पुणे येथे संपन्न झाले. ‘ए.के स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या ‘लफंडर्स’चे दिग्दर्शक अमन खान आहेत.
राज आंधळे, शेखर नवतारे, अभिषेक भोसले, दीप्ती लोंढे, यांच्या प्रमुख भूमिकेसह सध्या लोकप्रिय असलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेमधील लाल्या मामाची भूमिका साकारत असलेले ‘शशिकांत डोईफोडे’ ही या वेबसिरीजमध्ये भूमिका साकारणार आहेत.
या वेबसिरीजचे लेखन पटकथा-संवाद अभिषेक भोसले यांचे असून प्रेम, कॉमेडी व ऍक्शन यांचा त्रिवेणी संगम असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास अमन खान यांनी व्यक्त केला.