बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
कोलोली येथे गरजू लोकांना मोहिनी मोहनराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोहनराव जाधव यांनी व दीपाली निगम पुणे यांनी 10 दिवस पुरेल आसा किराणा वाटप केले या प्रसंगी मोहनराव जाधव,मोहिनी जाधव, पोलीस उपनिराक्षक श्री शेख गावच्या सरपंच पल्लवी प्रमोद खेत्रे उपसरपंच सतीश काकडे तलाठी महेश धपाटे पोलीस पाटील विजय खेत्रे माजी सरपंच विष्णू काकडे बाळासाहेब खेत्रे बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच पल्लवी खेत्रे यांनी कोरोना काळात ग्रामपंचायतींनी गावाची काळजी घेण्यासंबंधी केलेली उपाययोजना याची माहिती दिली तशेच उपनिराक्षक शेख यांनी करोनाच्या काळात पाळावयाचे नियम यावर माहिती दिली तशेच मोहनराव जाधव यांनी कोरोना काळात पुण्यात व कोलेलीत त्यांच्या मार्फत केलेली मदत याची माहिती दिली कार्यक्रमाचे आयोजन संदीप काटे,राहुल गोसावी प्रमोद खेत्रे, व तरुण मंडळानं केले आभार गणेश खेत्रे यांनी मानले