महिला लोकशादिनानिमित्त देणाऱ्या येणाऱ्या तक्रारी ई-मेल किंवा पोस्टाद्वारे देण्याचे आवाहन

सातारा (जिमाका) 3:- दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत कोविड-19 मुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांना लोकशाही दिनामध्ये तक्रारी द्यावयाच्या आहेत त्या महिलांनी कार्यालयाच्या [email protected] या ई-मेल आयडीवर किंवा पोस्टाद्वारे देण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!