वाठार निंबाळकर : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर,आमदार मा.दिपकराव चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांना आव्हान करून प्रत्येक गावा गावात सहकार्य करून विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास सुरुवात केली व मार्गदर्शन केले.
वाठार निंबाळकर या गावात ही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला.वाठार निंबाळकर येथे सर्व सुविधा व सोयीयुक्त सुसज्ज विलगीकरण कक्ष एक प्रेरणादायी असून प्रत्येक गावाने याचा आदर्श घेतला पाहिजे तसेच आपले गाव पूर्ण कोरोना मुक्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी 7 मे रोजी विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनाच्या दिवशी उद्गारले होते. श्रीमंत संजीवराजे यांच्या एका शब्दामुळे संपूर्ण वाठार निंबाळकर गाव हे एकजुटीने या कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले आणि एका महिन्यातच रुग्णांचा 114 असणारा आकडा 4 वर आला आहे.
वाठार निंबाळकर हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने खूप
मोठे आहे 4500 हजाराच्या आसपास लोकसंख्या असतानाही अत्यंत कमी कालावधी मध्ये सर्वांच्या प्रयत्नामुळे गावातील रुग्णांची संख्या अतिशय कमी होत आहे.
वाठार निंबाळकर येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या विलगीकरण कक्षासाठी वाठार निंबाळकर गावचे सुपुत्र सत्यजित नाईक-निंबाळकर डायरेक्टर शिंदे डेव्हलपर्स यांचे संकल्पनेतून व आर्थिक मदतीतून तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदूभाऊ नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोक सहभागातून अतिशय चांगल्या प्रकारे 45 बेड चे विलीनीकरण कक्ष स्थापन झाले असून या कक्षासाठी गावातील सर्व दानशूर व्यक्तीकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाले.गावातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सुमारे 75 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व विलीनीकरण कक्षातील सर्व रुग्णांना दोन वेळेस शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय केली.तसेच सकाळी नाश्त्यासाठी अंडी व संध्याकाळी फळे याची व्यवस्था केली.
गावातील तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी स्वच्छतेची सर्व जबाबदारी घेऊन स्वखर्चातून त्या ठिकाणी सफाई कामगार व कंपाउंडर यांची नेमणूक केली. सदर विलगीकरण कक्षासाठी गावातील डॉ.रवींद्र बिचुकले, डॉ. नेताजी निंबाळकर, डॉ. अनिकेत जगदाळे तसेच गिरवी आरोग्य केंद्राचे डॉ. राठोड सर्व
आरोग्यसेविका, यांनी नियमित रुग्णांना तपासणी केल्यामुळे रुग्ण लवकरच बरे झाले. वाठार निंबाळकर येथील विलगीकरण कक्षात सद्या 5 ऑक्सीजन मशीन,प्रत्येक वर्गामध्ये सुसज्ज फॅन तसेच जनरेटर सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा तसेच पाणी फिल्टर सुविधा तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी,2 L.C.D स्क्रीनही बसवण्यात आल्या. या विलगीकरण कक्षात स्त्रियांना व पुरुषांना सर्व सोयी सुविधा वेगवेगळ्या करण्यात आल्या आहेत.
सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक तसेच कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी गावात स्वयंशिस्त लावली असून नवीन रुग्ण जास्त सापडत नाही आणि जरी कुणाला थोडी जरी लक्षणे जाणवली तरी ते स्वतःहून कोरोना टेस्ट करून रिपोर्ट समजले समजल्या विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत.वाठार निंबाळकर येथील विलगीकरण कक्षाला गावातील असंख्य दानशूर व्यक्तीने सॅनिटायझर, मास्क, वाफारा मशीन, मेडिकल किट,खाऊ, इत्यादी साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे.
या सुसज्ज अशा विलगीकरण कक्षाला. युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ( बाळराजे), ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. सावंत साहेब,
गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे मॅडम यांनी भेट देऊन सर्व ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते यांचे कौतुक केले.