दिलीप सोनवणे यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार,सोबत मिलिंद मोहिते,नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप निवृत्ती सोनवणे यांचा सेवा निवृत्ती निमित्त विद्या प्रतिष्ठान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार विजय पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर
मुखधिकारी किरणराज यादव,डॉ मनोज खोमणे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्तीत होते.
पोलीस हवालदार ते पोलीस उप निरीक्षक पदा पर्यंत मजल मारताना निष्कलंक,एक ही गैरहजेरी नाही ,उत्कृष्ट सेवा पदके मिळवत सलग 35 वर्ष सेवा झाली आहे,पुणे जिल्ह्यात यवत,नीरा,जेजुरी,दौंड,सासवड,
बारामती गुन्हे शाखा,बारामती शहर आदी पोलीस स्टेशन ला सेवा केली आहे ,अमित सोनवणे खून खटला मध्ये सलग 2 दिवस मेंढपाळ धनगर च्या वेशात रानावनात राहून आरोपींना पकडले होते अशा प्रकारे अनेक म्हतपूर्ण प्रकरणात आरोपींना पडण्यात त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस खात्यांतर्गत अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
“दिलीप सोनवणे यांच्या अनुभवाचा पोलीस दलाला नक्की फायदा झाला त्यांचे कार्य आदर्शवादी असून पोलीस दलाची मान उंचावेल आशा प्रकारे उत्कृष्ट कार्य होते” असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.