फेरेरो कंपनीच्या वतीने मदतीचे पत्र व बेड अजित पवार यांच्या कडे सुपूर्द करताना कुंदन पटेल,मुकेश दुगानी,अर्चना खडके व बाळासो डेरे (छाया अनिल सावळेपाटील)
———————————————–
बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील ‘फेरेरो इंडिया ‘ कंपनीच्या वतीने सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय अंतर्गत महिला हॉस्पिटल मधील कोविड सेंटर व परिसरातील कोविड सेंटर साठी 100 बेडस व वैदकीय उपकरणे दिली जाणार आहेत शनिवार 22 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी फेरेरो इंडिया चे मुख्य वित्तीय अधिकारी कुंदन पटेल,प्लांट एच आर मॅनेजर मुकेश दुगानी,प्रशासकीय अधिकारी अर्चना खडके,कर्मचारी संघटना अध्यक्ष बाळासाहेब डेरे व वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरपरिषद गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे व फेरेरो कंपनी चे अधिकारी,कर्मचारी उपस्तीत होते
बारामतीकरा साठी पीएट्रो फेरेरो किंडर गार्डन,अंगणवाडी प्रकल्प,2.5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प व इतर विविध कामे सी एस आर फंडा मार्फत कंपनीने या पूर्वी केली आहेत व कोरोना च्या महामारीत फेरेरो इंडिया शासनाला व बारामती कर जनतेला नेहमी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
फेरेरो इंडिया ने नेहमीच सामाजिक उपक्रमात आघाडी घेतली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले कार्य खूप म्हतपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवउद्गार काढले.
कंपनीच्या वतीने उपस्तीत सर्वांचे आभार मानण्यात आले.