जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा
वीज कर्मचारी अभियंते व आधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स ऑनलाईन बैठक झाली त्या बैठकीला बारामतीमधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे पदाधिकारी
श्री बाळासाहेब गायकवाड उप सरचिटणीस श्री कल्याण धुमाळ प्रादेशिक सचिव पुणे श्री दत्तात्रय माहुरकर परिमंडळ सचिव बारामती तसेच मंडल स्तरावरील पदाधिकारी धनाजी तावरे राजू दराडे विनोद तावरे जैनुद्दीन आतार वसंत कुंभार आनंत सावंत आदी पदाधिकारी उपस्तीत होते.
आधिकारी व कंत्राटी कामगारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा द्यावा, प्राधान्याने लसीकरण करावे, ही मागणी प्रशासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली मात्र सरकार आणि प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्या मुळे शेकडो कामगार मृत्यू मुखी पडले हजारो कामगार व कर्मचारी बाधित झाले आहेत कोरोना काळात सर्व विद्युत सेवा चालू ठेवुनम महाराष्ट्रात सेवा देत असताना ४०० च्या वर आधिकारी व कर्मचारी कॉविड मुळे बाधित आहेत या कामगारांना प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.
आंदोलकांच्या मागण्या
वीज कम्फर अभियंते व आधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रँतलीने वर्कर प्रमाणे सुविधा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्या
सर्व आधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण करणे
कॉविड १९ मुळे मृत्यूमुखी पावलेल्या वीज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख रुपयांचे अनुदान द्यावे
तिन्ही कंपन्या करीत एम. डी. इंडिया या जुन्या टीपीए ची तात्काळ नेमणूक करणे
कोरोना आजाराचा महाराष्ट्र राज्यात उद्रेक पाहता वीजबिल वसुली करीता सक्ती करू नये
आदी मागण्या बाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार 24 मे रोजी काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक सचिव कल्याण धुमाळ यांनी दिली.