मुंबई :
पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते
मुंबई,बारामती वार्तापत्र रिपोर्ट पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक
निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी आपल्या भावना व्यक्त करून सुंदरलाल बहुगुणा यांनाश्रद्धांजली वाहिली आहे.
चिपको आंदोलनातून सुंदरलाल बहुगुणा यांनी केवळ झाडे वाचवली नाहीत तर पर्यावरण रक्षणाची चळवळ घराघरात नेली.सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते.
निसर्गाबद्दल नितांत आदर, जिव्हाळा असणारा निसर्गऋषी आपण गमावला आहे. पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.