गोखळी :
फलटण पूर्व भागातील गोखळीतील कोरोना विलिनीकरण कक्ष उभारण्याचा उपक्रम आदर्शवत असून तालुक्यातील ग्रामस्थांना अनुकरणीय आहे , असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ अमिता गावडे यांनी केले.
आज गोखळी येथील कोरोना विलगीकरण कक्षाला भेट दिली यावेळी डॉ गावडे बोलत होत्या. फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.अनिता गावडे यांनी भेट दिली. कक्षा मध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांशी प्रकृतीची चौकशी केली.
ग्रामस्थ राबवत असलेल्या विविध कामांची माहिती घेतली यावेळी राधेश्याम जाधव यांनी सांगितले की, लोकसहभागातून कोरोना विलिनीकरण कक्ष सुरू करत असताना समाजातील दानशूर व्यक्तींकडून सोशल मीडिया च्या माध्यमातून ( व्हाॅटअप) मदतीचे आवाहन करण्यात आले.याआव्हानास मोठा प्रतिसाद मिळाला शेकडो हात पुढे आले येत आहेत आठ दिवसांत एक लाख रुपये पर्यंत मदत जमा झाली अजून लागली तर मदत देऊ असे सांगण्यात आले. अमित गावडे यांनी सांगितले की, कोरोना संसर्गामुळे बाधीत रुग्णांना दररोज पिण्यासाठी, अंघोळीसाठी, गरम पाणी, सकाळी नाष्टा, दोन वेळा चहा, तीन अंडी, फलाहार नियमित देण्यात येतो.रुग्णाची आरोग्य तपासणी गावातील डॉक्टर शिवाजी गावडे, डॉ अमोल आटोळे, डॉ नितीन गावडे, डॉ विकास खटके विना मोबदला उपचारासाठी योगदान देत आहेत तसेच आरोग्य उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ सानिया शेख आरोग्य कर्मचारी लोंढे मॅडम, शिंदे मॅडम, आशा वर्कस सौ दुर्गा आडके नियमित करतात. जास्त गंभीर आजारी रूग्णांना फलटण- बारामती रूग्णालयात ॲडमिट करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. आज पर्यंत विलिनीकरण कक्षात २७ रूग्ण दाखल झाले त्यापैकी सहा रूग्ण कोरोना मुक्त झाले त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने समारंभ पूर्वक प्रत्येक रूग्णांना एक झाड देऊन निरोप देण्यात आला.यावर गटविकास अधिकारी डॉ अमिता गावडे यांनी तरूणांच काम कौतुकास्पद असून तालुक्यातील इतरांना अनुकरणीय आहे गोखळीकरांचा आदर्श घेऊन इतरांनी आपल्या गावी अशा पध्दतीने कोरोना विलिनीकरण कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न व्हायला हवेत असे सांगितले.यावेळी विलिनीकरण कक्षातील कोरोना मुक्त ३रूग्णाना. डॉ गावडे मॅडम यांचे हस्ते झाडं देऊन निरोप देण्यात आला.यावेळी तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे पाटील, उपसरपंच डॉ अमित गावडे, माजी उप सरपंच राधेश्याम जाधव, ग्रामपंचायतीचे सदस्य अभिजित जगताप, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, राजेंद्र भागवत, सुरेश चव्हाण, जालिंदर भंडलकर, सौ.विद्या जगताप आदी उपस्थित होते.