बारामती (फलटण टुडे ) :
म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव व त्याबाबत नागरिकांमध्ये असणारी भीती व अज्ञान या बाबींचा विचार करून बारामतीमध्ये म्युकरमायकोसिसचे तपासणी शिबिर नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन बारामती – फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.१९ मे २०१९ रोजी नटराज नाट्य कला मंदिर येथे संपन्न झाले.
कोविड होऊन गेलेल्या रूग्णांची यामध्ये विनामूल्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये आज ४१० रुग्णांनी तपासणी करून घेतली. या मधून म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे असलेले १६ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर पुढील उपचार करणे करिता नियोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये बारामती व फलटण येथील १८ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये डॉ. विश्वराज निकम, डॉ. आशुतोष आटोळे, डॉ. विक्रम फरांदे, डॉ. प्रीतम ललगुणकर, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. मंदार पाटील, डॉ. मोहनचंद पाटील, डॉ. राधिका कुलकर्णी, डॉ. तोशीता गोरे, डॉ. नंदिनी हाके, डॉ. प्रशांत हगारे. डॉ. सचिन कोकणे, डॉ. राजेंद्र ढाकाळकर, डॉ. सुहासिनी सोनवले, डॉ. हर्षल राठी, डॉ. वैशाली कोकरे, डॉ. नेत्रा सिकची, डॉ. रेवती संत, डॉ. चेतन गुंदेचा, डॉ. अमर अभंग यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तपासणीमध्ये म्युकरमायकोसिसने बाधित आढळून आलेल्या रुग्णांना बारामती मध्येच उपचार व्हावेत व याकरिता स्वतंत्र रुग्णालय तयार करणेचा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांना देण्यात येणार आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सदर हॉस्पिटल सुरू करण्याची कारवाई केली जाईल
शिबिरास उपविभागीय अधिकारी मा. दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी भेट दिली.
तसेच यापुढे दर बुधवारी सायं. ५ ते ६ या वेळेमध्ये नटराज मंदिर येथे मोफत तपासणी व सल्ला केंद्र सुरू राहील असे किरण गुजर यांनी याप्रसंगी सांगितले .