जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील
रियल डेअरी इंडिस्ट्रीज प्रा.लि.या कंपनीत अक्षय तृतीयाचे औचित्त साधून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वेतनवाढ करण्यात आली आहे.
सध्याच्या कोरोना महामारी संकटाचा सर्वच औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या संपूर्ण वर्षा मध्ये कंपनीच्या उत्पादनास असलेली मागणी दिवसेंदिवस घटत चाललेली आहे व एकूण उदयोगाचे आर्थिक चक्र बिघडलेले आहे.अशा बिकट काळा मध्ये सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा आर्थिक बोजा सहन करणे कंपनीला पोषक ठरणारे नव्हते, परंतु या अडचणीच्या काळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी कंपनीचे चेअरमन मनोज तुपे व संचालिका सौ अनिता तुपे यांनी अशा कठीण काळा मध्ये सुद्धा कंपनीवर वार्षिक ४० ते ५० लाखांचा अतिरीक्त आर्थिक बोजाचा विचार न करता कर्मचारी हित लक्षात घेऊन पात्र आधिकारी व कर्मचारी यांना दरमहा 3000 ते 7000 वेतन वाढ देण्याचे ठरविले. त्याचप्रमाणे जे अधिकारी व कर्मचारी करोनाच्या करणास्तव सुट्टीवर असतील अशा अधिकारी व कर्मचार्यांना व्यवस्थापणाने करोनाची पगारी सुट्टी दिली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सुशांत शिर्के,प्रीतम पारखे,प्रवीण तावरे,संदीप डफ,कुणाल कापसे,राजेंद्र शिंदे,अमित गायकवाड यांनी या वेतन वाढीचे स्वागत केले आहे. कंपनीचा सर्व आधिकारी कर्मचारी वर्ग सातत्याने व्यवस्थापनासोबत असेल असे सरव्यवस्थापक अमोल राऊत यांनी सांगितले. रियल डेअरीच्या माध्यमातून कोरोना च्या कठीण काळात कंपनी च्या उन्नतीसाठी झटणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक विकासासाठी कंपनी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चेअरमन मनोज तुपे यांनी सांगितले.
————————————–
Congratulations,Shri Manoj tupesaheb