बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी कपोते यांच्या मार्गदर्शना नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या साठी
शनिवार दि. १५ मे रोजी जंक्शन पोलिस स्टेशन,वालचंदनगर पोलीस स्टेशन,भवानीनगर पोलीस स्टेशन,बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन,अतिरिक्त पोलीस अधीक्षक ,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,,बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन या सर्व ठीकाणी करोना प्रतिबंध सोडियम हायड्रोक्साईडची औषध फवारनी केली;यावेळी पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा महिला संघटक सौ शुभांगी चौधर,इंदापुर तालुका अध्यक्ष दिलीप खाडे व तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दत्तात्रय सोननिस व महिला पोलीस कर्मचारी उपस्तीत होते.