कोवीड संकटात मदतीसाठी बारामती*चेंबरचा पुढाकार

साहित्य देताना शहाजीराव रणवरे,दत्ता कुंभार,अरुण म्हसवडे, प्रमोद काकडे व इतर

बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे करोना संकटामध्येही बारामती भागात चांगल्या आरोग्यसेवा पुरविणेत आलेल्या आहेत . त्यांचे या कार्यभागामध्ये एक छोटासा खारीचा वाटा उचलत बारामती औद्यौगिक वसाहतीतील अनेक उद्योजक बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या त्यांच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून कोवीड रुग्णसेवेसाठी विविध स्वरूपाची मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत.
शनिवार दि.15 मे रोजी बारामती चेंबर संचलीत अन्टरप्रुनर क्लबचे सभासदांकडून 100 पल्स आक्सि मिटर, 10 थर्मल गन व एक वाटर कुलर बारामती परिसरातील शासकीय रुग्णालयांना क्लबचे चेअरमन शहाजी रणनवरे यांनी आदरणीय दादांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले.बारामती क्याटल फिड प्रा.लि. या कंपनीतर्फे 2 टनाचे 3 एअर कंडिशनर , 50 फेस शिल्ड,प्रत्येकी 10000 सर्जिकल हेड क्याप, शुज कव्हर, 3 प्लाय मास्क, ह्यांड ग्लोव्हज,  5000 डिसपोजेबल आर्पन, 50 लिटर स्यानिटायझर,100 नग डेटाल स्प्रे ह्यांड वाश असे  5 लाख किंमतीच्या विविध वस्तू आज बारामती क्याटल फिडचे  एच . आर. प्रबंधक राहुल जाधव यांनी दादांचे  शुभ हस्ते मेडिकल कालेज कोवीड सेंटर व महिला रुग्णालय यांना प्रदान करण्यात आले.यावेळी आणखीन 5 लाख रुपये मेडिकल आक्सिजन प्लांट साठी देणेचे बारामती कॅटल फीड तर्फे घोषित करणेत आले.मेडिकल आक्सिजन जंबो सिलेंडर हाताळताना होणार त्रास कमी होणेसाठी योगीराज ट्रेलर एम.आय.डी.सी.बारामती  यांनी बनविलेली आक्सिजन ट्रालीचेही अनावरण दादांचे हस्ते करणेत आले व अशा 20 ट्रालीज विविध शासकीय रुग्णालयांना पुरविणेचे बारामती चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी यावेळी जाहिर केले.उद्योजक रमाकांत पाडोळे यांनी त्यांच्या लग्नाचे 25व्या  आनिवरसरी निमीत्त रुपये  25000 चा चेक कोवीड मदत फंडासाठी माननीय अजितदादांकडे प्रदान करणेत आला . 
बारामती चेंबरचे माध्यमातून कोवीडच्या या संकटामध्ये उद्योजकांनी अनेक शासकीय रुग्णालयांना विविध स्वरूपाची  मदत दिलेली आहे, यामध्ये  डिमेक कंपनी तर्फे रुग्णवाहिका , अनेक उद्योजकांकडून पल्स ओक्सीमिटर वाटप, रूग्णांसाठी पाणी वाटप व रुग्णालयात लागणारे  विविध वस्तू पुरविलेल्या आहेत.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल अजितदादांनी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती क्याटल फिडचे चेअरमन श्री सचिन माने , अन्टरप्रुनर क्लबचे अध्यक्ष शहाजी रणनवरे आणि योगिराज ट्रेलर चे संचालक अरुण म्हसवडे  व रमाकांत पाडोळे यांचे कौतुक केले व आभार मानले.
याप्रसंगी बारामतीचे प्रांत दादा साहेब कांबळे,तहसिलदार पाटीलसाहेब, डॉ.सदानंद काळे, डॉ.भोई , डॉ मनोज खोमणे ,संभाजी नाना होळकर , उद्योजक सचिन सातव ,बारामती चेंबर चे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, अरुण म्हसवडे, चंद्रकांत नलावडे राहुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!