सातारा दि. 14 (जिमाका) : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना माहे मे व जुन 2021 मध्ये वितरीत करण्यात येणारे अन्नधान्य पुढील प्रमाणे.
माहे मे 2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ ) व प्राधान्य कुटुंब लाभर्थी (प्रती माणसी 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्न्धान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे.
माहे जून 2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ ) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (प्रती माणसी 3 कि. गहु व 2 कि. तांदुळ गहू रु. 2/- प्रति किलो व तांदुळ रु. 3/- प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे. प्रधनमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्ष योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेलया अन्नधान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील 28210 अंत्योदय कार्डधारकांना व 1676616 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण रास्त भाव दुकानातून ई पॉस (e pos) द्वारे करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.