सातारा दि. 14 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. तथापि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एकूण ऑक्सिजन पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता ऑक्सिजन वाया न जावू देता ऑक्सिजनचा कार्यक्षम वापरणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्याय, शासकीय तंत्रनिकेतन शासकीय औक्षेगिक प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य व प्राध्यापक यांची सेवा 28 एप्रिलच्या आदेशानुसार अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.
रुग्णालयांच्या प्रमुखांनी व संस्था प्रमुखांनी तपासणी पथकास तपासणीकरीता आल्यानंतर पीपीई कीट, फेस शिल्ड, ग्लोव्हज् परीधान करणे व काढणे या बाबतची माहिती देवून ती उपलब्ध करुन द्यावी. तपासणी वेळी आढळलेल्या त्रुटींची पूर्तता निश्चिती मुदतीत करणे बंधनकारक आहे. संबंधित रुग्णालयाने रुग्णास आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा करणे अपेक्षित आहे. अति ऑक्सिजन पुरवठयामुळे गंभीर दुष्परीणाम दिसून आल्याने, रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा करावा. ऑक्सिजन ऑडीटबाबतचा त्रुटीपुर्तता अहवाल रुग्णालय प्रमुखांनी आक्सिजन ऑडीट पथकामार्फत सादर करावा. म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी Humidifer Bottle मध्ये Distilled Water टाकण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात ते उपलब्ध नसताना UV Treated प्रक्रीया उकळून केलेले थंड पाणी वापरण्याबाबत सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत साध्या नळाच्या पाण्याने भरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत रुग्णालयांना सूचना द्याव्यात.