आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा संघटनेच्या निवेदनाची सातारा जिल्हा परिषदेने घेतली दखल

फलटण दि. 11:
कोरोना (कोविड -19 ) या विषाणूंच्या नियंत्रण मिळवणे करता अत्यावश्यक सेवेत कामा करत असलेल्या जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीय यांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे बाबत .
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांना उपरोक्त विषयास अनुसरून जिल्हा परिषदेकडील अधिकारी व कर्मचारी हे कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रित करणेची कामे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे दररोज अनेक व्यक्तिंशी त्यांचा संपर्क येत आहे. सबब कोरोना संसर्गाने ते बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कारणास्तव जिल्हा परिषदेकडील प्राधान्यक्रमाने कोरोना संबंधित कामकाज करण्यासाठी ड्युटीवर असलेले अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व जिल्हा परिषद कर्मचारी  कोरोना सर्गाने बाधित झाल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कोरोना संबंधित कामकाज करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कोरोना आजारापासून बचाव होणेसाठी प्राधान्याने लसीकरण उपलब्ध करून देणेबाबत विनंती करणारे निवेदन देणेत आले होते.
या निवेदनाची गंभीर दखल सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेऊन या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग सातारा यांनी * कोविड-१९ बाधित अधिकारी / कर्मचारी यांना वैद्यकीय सोई सुविधा पुरविण्याबाबत पत्र काढून सदर बाब विचारात घेता प्रभावी उपाय योजना करणे व बाधित झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे कुटुंबातील व्यक्तीवर वेळेत उपचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधितांनी मागणी केलेनंतर आपले अधिनिस्त CCC/DCH/DCHC मध्ये त्यांना प्राधान्याने तात्काळ बेड उपलब्ध करून द्यावेत व पूर्ण संवेदनशीलतेने कार्यवाही पार पाडणे संदर्भात कार्यवाही करणेचे आदेश देऊन आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा यांचे निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करणेचे आदेश देण्यात आल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सातारा जिल्हा आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनच्या वतीने स्वागत व अभिनंदन करणेत आले.



Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!