फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमधील वॉर्ड बॉयला अटक; करत होता रेमिडिसवर काळाबाजार


सातारा दि. 9 (जिमाका) : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये  वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले.
 हा वॉर्ड बॉय रेमिडिसवरचे एक इंजेक्शन  35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. यापुढे असा कोणी रेमिडिसवर औषधाचा  काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!