बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती येथील ‘वुई द फिवचर ‘ ग्रुप चे सदस्य व व्यवसाईक प्रशांत गादीया,किरण गांधी,ऋषिकेश किर्वे या तिघानी या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्या खर्चातून सुपा येथील कोविड सेंटर साठी मदत केली आहे या मध्ये किरण गांधी यांनी 15 खाटा (पलंग) प्रशांत गादिया यांनी सॅनिटायझर व हॅन्डक्लोज तर ऋषिकेश किर्वे यांनी फिनेल दिले आहे.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉक डाऊन मध्ये सामाजिक भान व जाण जपत सदर मदत करून समाज्याची ऋण फेडत असल्याची भावना गादिया,गांधी व किर्वे यांनी व्यक्त केली.
या तिघांचे कार्य कौतुकास्पद असून इतरांनी या कठीण समयी याचा आदर्श घ्यावा असे आव्हान वुई द फिवचर ‘ ग्रुप चे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी केले आहे
सदर साहित्य देताना नटराज मंडळ चे अध्यक्ष व नगरसेवक किरण गुजर व बारामती नगरपरिषद चे उप नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव व सहकारी उपस्तीत होते.