रुग्णवाहिका सुपूर्द करताना अजित पवार,प्रमोद काकडे,दत्ता कुंभार व डिमेक कंपनीचे अधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
बारामती परिसरातील आरोग्य सेवेला मदत होणेसाठी प्रांत कार्यालय ,एम.आय.डी.सी
कार्यालय बारामती आणि बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज यांचे आव्हानाला प्रतिसाद देत डिमेक फौंडेशन पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमीकल कंपनी ( डिमेक) एम आय डी सी बारामती यांनी महिंद्रा कंपनीची सुसज्ज रुग्णवाहिका शनिवार 07 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शासकीय महिला रुग्णालय चे उपअधीक्षक डॉ बापूसाहेब भोई यांचेकडे सुपुर्त करण्यात आली.
याप्रसंगी प्रांतसाहेब दादासाहेब कांबळे ,एम आय डी सी चे कार्यकारी अभियंता एस आर जोशी, उप अभियंता स्वप्नील पाटील , सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे,तालुका आरोग्यधिकारी डॉ मनोज खोमणे आणि डिमेक कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक युवराज काळे, उप महाप्रबंधक श्री निलेश आंदळकर , राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरपरिषद चे गटनेते सचिन सातव , बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष श्री दत्ता कुंभार व चेंबर चे पदाधिकारी सभासद उपस्तीत होते.
सदरच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल डिमेक नातू फौंडेशन व डिमेक कंपनीच्या चेअरमन प्रभा नातू व डिमेक कंपनी उपाध्यक्ष नागेश कोरे यांचे अजित पवार यांनी बारामती कर जनतेच्या वतीने आभार मानले.