आसू- आसू येथील सर्व ग्रामस्थांच्या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळत असून काही दिवसातच आसू येथे लसीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनी सा.फलटण टुडे ला बोलताना दिली.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी लस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे ही गोष्ट लक्षात घेता आसू येथील ग्रामस्थांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी बरड येथील आरोग्य सेवा केंद्रात तसेच पवारवाडी येथील उपआरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागत होते. परंतु यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती बऱ्याच जणांना आरोग्य सेवा केंद्रात जाऊन सुद्धा लस मिळाली नाही काहीजणांना लस न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे लोकांमधून प्रकर्षाने आसुत लसीकरण कॅम्प सुरू करावा अशी मागणी होत होती.
यासाठी मी प्रयत्न करत होतो असे शिवरूपराजे यांनी बोलताना सांगितले व काल त्या मागणीला शासनाने परवानगी दिली आहे मागील तीन ते चार दिवसात झालेल्या लसीकरणासाठी लस उपलब्ध झाली नाही त्यामुळे बराचसा बॅगलॉक राहिला असून तो बॅकलॉग पूर्ण झाला की लगेच आसू येथे लसीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की आसू मधील ग्रामस्थांनी सुरवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ग्रामसेवक यांच्याकडून कुपन देऊन तुम्हाला दिवस दिला जाईल त्या दिवशी येऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसू या ठिकाणी लसीकरनाचा लाभ घ्यावा व लसीकरणाला येताना मास्क व कोरोना संदर्भात जे काही नियम असतील त्या नियमांचे पालन करावे व त्याठिकाणी कोणीही गर्दी करू नये असे आव्हान श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी केले व लसीकरणाला परवानगी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.