सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या व फलटण
तालुक्यामध्ये कोरोनाबाधीतांची संख्या खूप मोठ्याझपाट्याने वाढत चाललेली आहे. ही जिल्ह्यासाठी व फलटण तालुक्यासाठी चिंतेची बाब लक्षात घेता
फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी
शिवाजीराव जगताप यांनी
पूर्ण फलटण
शहरामध्ये कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद
काटकर यांनी कळविले आहे की, रविवार दिनांक २ ते ८ मे अखेर
फलटण शहरातील वैद्यकीय व मेडिकल अस्थापना वगळता सर्व
आस्थापना बंद राहतील यामध्ये प्रामुख्याने फलटण शहरातील
सर्व किराणा मालाची दुकाने, सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांची
स्टॉल्स, शहरांमधील कारखाना व मार्केट यार्ड त्याचबरोबर
शहरातील सर्व बँका बंद राहतील, बांधकाम विषयी सर्व कामे सुद्धा बंद राहतील, मंडई, दूध व फळ विक्रेते
यांची घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी
नगरपरिषद प्रशासनाने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नोडल
अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांची तसेच भाजीपाला, ,
फळविक्रेते व दूध विक्रेते यांची यादी लवकरच म्हणजे तात्काळजाहीर केली जाईल त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नसल्याची
माहितीही मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे. या सर्व
गोष्टींची फलटण शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी.तसेच विनाकारण शहरांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले