मुंबई : फलटण टुडे वृत्तसेवा
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दरम्यान शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अखेर विश्रांती. राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. विदर्भातील तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून अखेर विश्रांती देण्यातआली आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1
मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दरम्यान
शाळांना सुट्टी राहणार आहे. तर 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु
होणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार केल्या जात
असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत.
विदर्भातील तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरु होणार
आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून शाळा जरी अनेक
ठिकाणी बंदच राहिल्या तरी ऑनलाइन वर्ग सुरु होते. ऑनलाइन
शिक्षण देऊन अभ्यासक्रम यावर्षी शिक्षकांनी पूर्ण केला. मात्र, कोरोनाची
राज्यातील सद्यस्थिती नुकताच इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना
परीक्षा रद्द करून व त्यांना पास करून पुढील वर्गात प्रमोट केले तर
इयत्ता 9 ते 11 वर्गाच्या परीक्षा सुद्धा रद्द केल्या आहे. तरीसुद्धा, अनेक
शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग शिक्षकांकडून घेतले जात होते.
त्यामुळे शैक्षणिक वर्ष समाप्ती करून सुट्टी जाहीर करावी अशा आशयाचे
पत्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
पाठवण्यात येत होते. याची दखल घेत, आज शाळांना सुट्टी देण्याबाबत
निर्णय जाहीर करण्यात आला. नवे शैक्षणिक वर्ष जरी 14 जूनपासून सुरु
होणार असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याबाबतचा निर्णय कालांतराने
कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत कळविले जाणार आहे.
त्यामुळे सध्याच्या कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइनच
होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांबाबच स्थानिक कोविड
स्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे.