बारामती:
बारामती शहर व तालुक्यात सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण खाजगी व शासकीय रुग्णालयात चालू आहे परंतु वाढत्या गर्दी मुळे ,सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने कोरोना विषाणू चेंगरून जात असल्याची चर्चा जोरदार होत आहे
म्हणजेच सदर गर्दी मुळे कोरोनाचा प्रसार जोरदार होत आहे.
बऱ्याच खाजगी रुग्णालयात आता कोरोनाचे रुग्णावर उपचार करण्यासाठी वेगळे वार्ड केलेले आहेत ते रुग्ण ,त्यांचे नातेवाईक व कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेले नागरिक गर्दी मध्ये मिसळून जात आहेत.कोरोना रुग्णाच्या वार्ड शेजारी च काही ठिकाणी लसीकरण चालू असते स्थानिक प्रशासन ला याचे काही देणे घेणे नसते आलेल्या नागरिकांना लस टोचवणे ,पैसा कमविणे हे ध्येय असते वास्तविक पाहता लसीकरण वेगळ्या जागेत घेणे गरजेचे असते त्यामुळे कोरोना रुग्णाचा कसलाही संबध येणार नाही.
शासकीय यंत्रणाने आशा खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
” लस देताना खाजगी रुग्णालयांची सोशल डिस्टन्स पाळावे या साठी यंत्रणा उभी करावी,कोरोना रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक किंवा कोरोना तपासणी साठी आलेले रुग्ण यांचा सम्पर्क येणार एकमेकांना येणार नाही याची दक्षता घ्यावी” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश देशपांडे यांनी केली.
तर गर्दी ,सोशल डिस्टन्स नाही, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णां साठी व लसीकरण साठी आलेल्या सर्वाना एकाच ठिकाणाहून प्रवेश देत असताना
लसीकरण मार्फत पैसा कमवताना कोरोना चा प्रसार खाजगी रुग्णालय प्रशासन करत असल्याबद्दल पोलीस प्रशासन कडे तक्रार करणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत देवकाते यांनी सांगितले.