जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती एमआयडीसी येथील व्हेंनचर स्टील प्रा ली यांच्या वतीने महिला शासकीय रुग्णालय च्या नर्सिग स्कुल मधील कोविड सेंटर च्या रुग्णांसाठी स्टेलन्स स्टील चे उच्च प्रतीचे दहा बेड शुक्रवार दि.23 एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात आले.
व्हेंनचर स्टील प्रा ली च्या संचालिका कै. सौ छाया बाबासाहेब शेंडे यांचे ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना मुळे निधन झाले आहे.त्यांच्या स्मरणार्थ त्याचे पती व्हेंनचर स्टील चे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब शेंडे यांनी सामाजिक भान जपत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दहा बेड कोविड सेंटर ला सुपूर्द केले.या प्रसंगी कंपनीचे अधीकारी प्रतीक करंजकर,
अभिजित माने
व महिला शासकीय रुग्णालयाचे
उपअधीक्षक डॉ बापूसाहेब भोई व अधिकारी, कर्मचारी उपस्तीत होते.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान व जाण ठेवत प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सदर सहकार्य व्हेंनचर स्टील परिवाराने केले आहे हे कौतुकास्पद आहे याचा आदर्श इतरांनी घेऊन या कठीण समयी प्रशासनाला सहकार्य करावे “असे ही आव्हान डॉ बापूसाहेब भोई यांनी या प्रसंगी केले.
————————–