जळोची: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने
रुई कोविड सेंटर येथील प्रत्येक वार्ड मधील व कार्यालयातील इलेक्ट्रीक पंखे,ट्यूब,फ्रीज व विजेवर असणारी सर्व उपकरणे यांची स्वछता,दुरुस्ती व आवश्यक असेल तिथे नवीन उपकरणे बसवण्यात आली आहे.
सध्याची कोरोना ची स्तिथी पाहता रुग्ण खाजगी रुग्णालयात जेव्हा उपचार घेतो तेव्हा हजारोची बिल देत असतो पण त्याच बदल्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे सुरज बाळासाहेब चौधर व त्यांच्या सहकारी यांनी शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर रुई येथे त्यांच्या नातेवाईकांनि उपचार घेतल्यानंतर जो खर्च वाचला त्यातून सहकार्य म्हणून हॉस्पिटल च्या सर्व बंद असलेल्या ट्यूब लाईट व फॅन बदलून दिले व अवश्यतेनुसार उपकरणाची दुरुस्ती व स्वछता केली.
यावेळी रुई हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे , रवी निकम व रुग्णाचे नातेवाईक उपस्तीत होते.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत रुग्णाना व प्रशासनाला प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष फायदा होईल असे कोणतेही काम करणे म्हणजे राष्ट्र सेवा व माणुसकी होय ,म्हणून विद्युत उपकरणे स्वछता,दुरुस्ती व बदली मोहीम राबवली आहे व यानंतर प्रत्येक कोरोना सेंटर मध्ये आशा स्वरूपाचे काम करण्यात येईल असेही सूरज चौधर यांनी सांगितले.