जळोची:
लॉक डाऊनच्या काळात मोल मजुरी करणारे,हातावर पोट असणारे मजूर व एसटी स्टँड,रेल्वे स्टेशन,फुटपाथ,मंदिर च्या शेजारी भिक्षा मागणारे आदी ना सह्याद्री डेअरी च्या वतीने मोफत दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था बंद पाकीट मध्ये करून देण्यात येत आहे.बारामती एमआयडीसी मधील मजूर अड्डा ,शहर एसटी स्टँड,रेल्वे स्टेशन, शहरातील विविध मंदिर आदी ठिकाणी असणारे भिक्षुक आदी ना अन्न पाकिटे देण्यात सकाळी व संध्याकाळी आशा दोन वेळात देण्यात येत आहेत या कामी सचिन घाडगे,योगेश दळवी,प्रमोद शिंदे,अमित गावडे,सचिन वाबळे,विकास घाडगे,विशाल घाडगे,ओम सातव,वेदांत माने आदी सहकार्य असते ” सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम दरवर्षी राबवत असतो या वर्षी फक्त कोरोना मध्ये फक्त अन्नदान हा उपक्रम राबवत असल्याचे सह्याद्री डेअरी च्या वतीने सांगण्यात आले.
अन्नदान करताना सह्याद्री डेअरी चे पदाधिकारी
—————————