फलटण दि.१३ :
राज्यात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलेले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहर यांनी मंगळवार दि.१३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वा. ब्लड बॅंक, फलटण येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद आहे. असे मत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केले.
शिबिराचे उदघाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण साहेब व सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते पार पडले. नुकत्याच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या, त्यानंतर अल्पकाळात विद्यार्थी सेलने सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), माजी नगरसेवक व युवा नेते मा.श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर (बाबा), गोविंद मिल्क ॲंण्ड मिल्क प्रोडक्ट्सचे संचालक व युवा नेते मा.श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण पंचायत समिती सदस्य व युवा नेते मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
तसेच फलटण ता.दूध पुरवठा संघाचे मा.चेअरमन मा.श्री.भिमदेव बुरंगले, मा.सभापती मा.श्री.दत्तात्रय गुंजवटे, यश कन्ट्रशनचे मा.श्री.राजीव नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे, तालुकाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष निलेश जठार, निरंजन पिसाळ, तालुका सरचिटणीस गौरव पवार, प्रतिक पवार, तालुका संघटक प्रसाद जाधव, प्रथमेश शेलार, प्रताप नाळे, स्वप्निल पिसाळ, शहराध्यक्ष आकाश सोनवलकर, शहर उपाध्यक्ष गौरव नष्टे, शहर संघटक ओम पवार या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर उत्स्फूर्त रित्या पार पाडले.