बारामती :
राज्य शासनाच्या निर्णयानुसार लॉक डाऊन सुरू झाले परंतु गुरुवार 15 एप्रिल रोजी एमआयडीसी बारामती मधील अत्यावश्यक सेवा मधील व इतर कंपन्या चालू होत्या रिक्षा,बेकरी,दुग्धजन्य पदार्थ दुकाने,किराणा दुकाने चालू होती तर चौका चौकातील अत्यावश्यक सोडून इतर दुकाने बंद होती
ज्यांचे चालू आहेत ते खुश होते तर ज्यांचे बंद आहे अशी मंडळी नाराज होते त्यामुळे कभी खुशी कभी गम अश्या प्रकारचे वातावरण एमआयडीसी परिसरात होते.
पेन्सील चौक ,सिटी इन चौक,संदीपा कॉर्नर,कल्याणी कॉर्नर,कटफळ चौक,डायनॅमिक्स कंपनी चौक,वंजारवाडी चौक ,टेक्स्टाईल पार्क आदी ठिकाणी आत्यावश्यक सेवा मधील दुकाने चालू होती तर,हॉटेल मधील खाद्यपदार्थ पार्सल सेवा चालू होती.
नेहमी वर्दळ असणारा पेन्सील चौक बऱ्यापैकी बंद च होता नेहमी असणारी गर्दी नव्हती .एमआयडीसी मधील ज्यांची दुकाने बंद आहेत अशा व्यापाऱ्यांनी सदर लॉकडाऊन मध्ये आशा प्रकारे बंद केल्याने उघड नाराजी व्यक्त केली
“मोरीचे छिद्र बंद करणे व दरवाज्यातून जाऊ देणे ” आशा प्रकारे सदर लॉकडाऊन असल्याची टीका कापड व्यवसाईक अशोक आटोळे यांनी केली.
कंपनीतील कामगार घरोघरी,गावोगावी जाणार येणार त्याच प्रमाणे अत्यावश्यक सेवा मधील खरेदी करण्यासाठी नागरिक जाणार येणार म्हणून कोरोना वाढणार आहे त्यामुळे गेल्या वर्षी सारखा कडक लॉक डाऊन होणे गरजेचे असल्याचे असल्याचे मत इस्त्री व्यवसाईक मनोज दळवी यांनी सांगितले.