फलटण ( वार्ताहर):
सध्या जगभरात देशात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे चे रुग्ण संख्या वाढत आहे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून (covishield आणि covaxin) लसीकरण सुरू आहे गोखळी गावांमध्येही जिल्हा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये सदर लसीचे नियोजन सुरू होते मात्र कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी रेफ्रिजरेटर नसल्यामुळे अडचण भेडसावत होती लसीकरण 6 एप्रिल 2021 रोजी होत आहे ही गोष्ट श्रीराम पत संस्थेच्या संचालकांना समजली त्यांचे व्यवस्थापक महेश जगताप यांनी तातडीने सर्वांच्या कानावर ही गोष्ट घालून पतसंस्थेच्या निधीमधून उपकेंद्रास रेफ्रिजरेटर दिनांक 3 एप्रिल रोजी उपकेंद्राच्या डॉक्टर शेख व सिस्टर लोंढे यांच्यासमक्ष फलटण डॉक्टर असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉक्टर विकास खटके त्यांचे सहकारी डॉक्टर नितीन गावडे डॉक्टर अमोल आटोळे यांच्या हस्ते व माजी सरपंच नंदकुमार गावडे, पतसंस्थेचे संचालक रमेश दादा गावडे जनार्दन साळुंखे विश्वनाथ वनारसे सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत भेट म्हणून दिला तसेच संस्थेचे हितचिंतक सभासद सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता.. हा रेफ्रिजरेटर लस 2 अंश ते 8 अंश सेल्सियस तापमानामध्ये ठेवण्यासाठी मदत करणार असून त्यामुळे परिसरातील लसीकरणाला वेग देता आला.. रेफ्रिजरेटर फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे माननीय उपाध्यक्ष डॉक्टर विकास खटके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर विकास यांनी संस्थेबद्दल गौरव उद्गार काढले आणि या संस्थेचे सर्व संचालक सभासद कर्मचारी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करत असतात असेच काम पुढे चालू ठेवावे अशी आशा व्यक्त केली उपकेंद्राच्या डॉक्टर शेख तसेच आशा वर्कर्स लोंढे सिस्टर यांनी श्रीराम पतसंस्थेने सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले पहिल्याच दिवशी 240 पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.