आय टी सी च्या वतीने ' रियल डेअरी' चा सन्मान

उत्कृष्ट पुरवठादार प्रमाणपत्र सहित रियल डेअरी चे सर्व अधिकारी
जळोची ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती एमआयडीसी मधील रियल डेअरी प्रा ली या कंपनीस ‘उत्कृष्ट पुरवठादार’ म्हणून बेंगलोर येथील  अन्न प्रक्रिया उद्योगातील  आंतरराष्ट्रीय मानांकित आय टी सी लिमिटेड या कंपनीने गौरव केला आहे.
सोमवार 22 मार्च रोजी बेंगोलर येथे ऑनलाइन पध्दतीने सदर समारंभ पार पडला या मध्ये देशातील व परदेशातील दूध क्षेत्रातील सर्वाना आमंत्रित करण्यात आले होते या वेळी  सदर पुरस्काराची घोषणा करून  प्रमाणपत्र देण्यात आले.
रियल डेअरी ग्राहकांच्या आरोग्याशी व अन्न सुरक्षाशी निगडित बांधिलकी जपत असून उत्पादन प्रकिया व पुरवठा साखळीतील उच्चतम गुणवत्ता व स्वच्छ मानदंडाचे पालन काटेकोर पणे करते. कोविड 19 च्या महामारी मध्ये सुद्धा सर्व प्रकारची सुरक्षिते ची काळजी घेऊन ग्राहकाच्या सेवेत सातत्य व गुणवत्ता राखली असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमोल राऊत यांनी सांगितले.
गुणवत्ता, दर्जा , सातत्य व ग्राहकांचा विश्वास जिंकत हिंदुस्थान युनिलिव्हर,टाटा केमिकल,अलाना फूड्स,पतंजली सारख्या 
नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यास पुरवठा करतो त्याच प्रमाणे उत्कृष्ट कार्याची दखल घेत 2020 मध्ये ब्रिटानिया  कंपनी कडून सन्मानित करण्यात आले होते.
रियल डेअरी उत्पादन करीत असलेले अन्न पदार्थ  निर्मितीसाठी घटक वापरताना उच्च गुणवतेची मानांकन चे कठोर पणे पालन करतो त्याचीच पोच पावती म्हणून आय टी सी कंपनीने ‘उत्कृष्ट पुरवठादार’ म्हणून  सन्मानित केले आहे या नंतर सुद्धा या कार्यात सातत्य ठेवू असा विश्वास रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे व  कार्यकारी संचालिका अनिता तुपे यांनी सांगितले.
सदर प्रमाणपत्र श्री मनोज तुपे  व सौ अनिता  तुपे यांच्या हस्ते कंपनी प्राशसनास सुपूर्द करण्यात आले.या वेळी कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!