राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतक-याना, मिळालेल्या
उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल या मध्ये वाढ होऊन आणखी
उमेदीने नवनवीन अद्यावत तांत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी
शेतकर्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकर्यांना होऊन राज्याच्या
एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत राबविली जात आहे.असे मंडल कृषि अधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी पीक स्पर्धा पुजा दुदुस्कर यांनी सांगीतले.सांगवी गावचे प्रगतीशील शेतकरी राजेंद्र आनंदराव जाधव यांचे शेतावर पीक स्पर्धा अंतर्गत गहू पीकाचा पीक कापणी प्रयोग पंचाच्या उपस्थीती मध्ये पार पडला या प्रसंगी त्या बोलत होत्या.
तसेच याप्रसंगी सांगवी गावचे नवनिर्वाचीत सरपंच संतोष उर्फ सनी मोरे हे उपस्थित होते,ते यावेळी म्हणाले की पीक स्पर्धा हा शासनाचा एक स्तुत्य उपक्रम असून यामुळे शेतकर्यांमध्ये विविध पीकांच्या उत्पादकता वाढीसाठी सुद्रुढ स्पर्धा होऊन अधिकाधीक उत्पादन वाढ व तंत्रज्ञान प्रसार होण्यास मदत होईल. अर्धा एकर गहू क्षेत्रा मधून १(एक) गुंठे प्लॉटची यद्रुच्छित पछतीने निवड करून पंचा समक्ष कापणी करून धान्याचे वजन घेण्यात आले.हेक्टरी सुमारे ६० पूर्णांक ४०५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन मिळाल्याचे यावेळी दिसून आले.
गहू पीक लागवडी मध्ये सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे तसेच कृषि विभागातील अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे पीक स्पर्धेमध्ये सहभागी प्रगतीशील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी आर्वजून सांगीतले.
यावेळी मंडल कृषि अधिकारी अमोल सपकाळ कृषि पर्यवेक्षक अंकुशराव इंगळे,डि.व्ही.पोरे, सांगवी गावचे पोलीस पाटील रमेश बडचीकर ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे,संदिप ठोंबरे पंच या नात्याने उपस्थित होते.तसेच प्रगतीशील शेतकरी सलीम शेख,पोपटराव मोरे,काशिनाथ इंगळे, तुकाराम मोरे, बाळासो माने,बाळासो वाघ आदि ऊपस्थीत होते.सर्फराज शेख यांनी उपस्थीतांचे आभार व्यक्त केले.