फलटण :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात आला त्यानिमित्ताने ज्ञानदिप शिक्षण संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
धुळदेव येथील सुपुत्र सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग ) मनोज चंद्रकांत जाधव यांचा ज्ञानदिप शिक्षण संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी.ढोबळे, संस्थाप्रमुख सी.डी.डोबळे, धुळदेव गावचे माजी सरपंच सुभाष शिंदे, माजी मुख्याध्यापक शिंदे, युवा नेते अतुल फरांदे तसेच महसूल चे कर्मचारी बाळासाहेब भंडलकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे स्विच बोर्ड ऑपरेटर (SBO)बाळासाहेब चव्हाण, पत्रकार सुहास भंडलकर, त्याच प्रमाणे ज्ञानदीप शिक्षण संस्थेमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.