फलटण (फलटण टुडे वृत्तसेवा ):
हॉकी महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने बालेवाडी पुणे येथे दिनांक १८ ते १९ फेब्रुवारी २०२१
दरम्यान झारखंड येथे होणाऱ्या ११ व्या हॉकी इंडिया सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची
निवड चाचणी घेण्यात आली सदर निवड चाचणीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून ६० ते ७० खेळाडू
सहभागी झाले होते. यातून कु. श्रावणी विनोद बनकर व कु. दिक्षा नितीन शिंदे या मुधोजी
हायस्कूलच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या मुलींच्या संघामध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धा दिनांक १०ते १७ मार्च २०२१ दरम्यान झारखंड येथे होणार आहेत.या अगोदर या दोन्ही खेळाडूंनी मागील वर्षी झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर हॉकी स्पर्धेतकास्य पदक पटकविले होते. कु. दिक्षा शिंदे चे मागील वर्षी १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय हॉकीस्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
या दोन्ही खेळाडू हॉकी सातारा या संघटनेच्या वतीने
निवड चाचणीसाठी सहभागी झाल्या होत्या
या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष महाराष्ट्र खो -खोअसोसिएशन व सेक्रेटरी,फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण यांच्या शुभहस्ते झाला.
या सर्व यशस्वी खेळाडूना जि क्री कार्यालय साताराचे हॉकी क्रीडा मार्गदर्शक श्री महेश
खुटाळे तसेच मुधोजी हायस्कूलचे हॉकी क्रीडा मार्गदर्शक श्री सचिन धुमाळ व खुरंगे बी बी.,
क्षीरसागर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मा ना श्रीमंत रामराजे नाईक
निंबाळकर,सभापती विधान परिषद,महाराष्ट्र राज्य,मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन,फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण,मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष महाराष्ट्र खो -खोअसोसिएशन व सेक्रेटरी,फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण ,स्कूल कमिटीचे व्हा चेअरमन श्री.रमनलाल दोशी व स्कूल कमिटीचे सर्व सदस्य,फ ए सो क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे श्री शिरीष वेलणकर व कमिटिचे सर्व सदस्य, वरिष्ठ हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर, श्री.अरविंद निकम प्रशासन अधिकारी, श्री श्रीकांत फडतरे अधिक्षक फ ए सो. फलटण,तसेच प्राचार्य श्री.खुरंगे के.बी ,उपप्राचार्य अहिवळे सर व श्री. फडतरे सर पर्यवेक्षक श्री ननावरे सर, श्री. भोसले सर,श्री. गोडसे सर, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.