फलटण – वाचन साखळी समुहाच्या संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे व प्रतिभा टेमकर यांचा आज आई प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. प्रत्येक स्त्री ही कर्तृत्ववान असतेच, त्या सर्वांचा आपण सन्मान करत असतोच. विविध क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या
महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात विविध सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येत असतो.
Covid-19 मुळे संपूर्ण जग हे काही महिने लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. अशातच प्रतिभा लोखंडे व प्रतिभा टेमकर शिक्षक महिलांनी वाचनसाखळी समूह हा फेसबुक वर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 2 सदस्यांचे पासून सुरू झालेला वाचन साखळी समूहाने 3000 सदस्यांचा टप्पा पार केला आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
या वाचन साखळी समूहामध्ये प्रत्येक वाचकाने एक पुस्तक वाचन करायचे व त्या पुस्तकाचा अभिप्राय या ग्रुपवरती शेअर करायचा आणि दर महिन्याच्या शेवटी लकी ड्रॉ द्वारे पहिले तीन विजेते क्रमांक घोषित केले जायचे.तसेच सर्वात जास्त पुस्तक वाचन व जास्त कमेंट्स करणाऱ्या वाचकांनाही बक्षिसे दिली जायची व अजूनही दिली जातात. आकर्षक प्रमाणपत्र व पोस्टाद्वारे सुंदर असे पुस्तक भेट दिले जायचे व अजूनही दिली जातात. त्यातीलच एक भाग म्हणून पुढे या प्रतिभावंत दोन्ही महिला शिक्षकांनी वाचनसाखळी समृद्धी स्पर्धा सुरू केली. यामध्ये दिलेल्या विषयावर कविता व लेख हा वाचकाकडून व लेखकाकडून लिहिला जायचा व त्यातून परीक्षकाकडून निवडक नंबर काढून त्यांना पुस्तक, प्रमाणपत्र , याच बरोबर काही आर्थिक स्वरूपात थोडीशी रक्कम ही दिली जायची आणि आजही दिली जात आहे. या सगळ्या गोष्टींमुळे पुस्तकाची संगत वाढल्यामुळे सर्वांच्याच आयुष्यात रंगत आली. कारण चांगले संस्कार, चांगले विचार हे पुस्तकातून मिळत असतात.
वाचन सकाळी समूहावर आजपर्यंत असंख्य पुस्तके वाचून त्या पुस्तकाचा अभिप्राय ही वाचकांना वाचण्यास मिळाला. पुढील महिन्यात या वाचन साखळी समूहाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने या समूहातील वाचक व लेखकांचे गेट-टुगेदर घेण्याचेही संयोजकांनी ठरवले आहे. वाचन साखळीच्या छोट्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हे हे केवळ दोन्ही प्रतिभा यांच्या प्रतिभावंत गुणामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांच्या या असामान्य कार्यामुळे प्रत्येक घराघरांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली. पुस्तक वाचनाने मस्तक सुधारतं सुधारलेले मस्तक कोणाचेही हस्तक तर होत नाहीच, व कोणापुढे नतमस्तक होत नाही.
दुःख ,असो अथवा आनंद पुस्तके आपल्या सोबतीला असतात. ही गोष्ट वाचनसाखळी समूहाने साध्य करून दाखवली.त्यांच्या या असामान्य कार्यामुळेच आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांच्याकडून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वाचन साखळी समूहाच्या पुढील वाटचालीस व जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आई प्रतिष्ठान परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.