शोभा भागवत यांना आदर्श माता पुरस्कर

फलटण–(९)=     ८मार्च जागतिक महिला दिनानिमित्त.  लायनेस क्लब ऑफ फलटण ( आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना डिस्ट्रिक्ट-३२३४D1) यांचे ‘सन्मान तेजस्विनीचा’ या कार्यक्रमाअंतर्गत गोखळीच्या  सौ.शोभा राजेंद्र  भागवत यांना ” आदर्श माता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले व कोरोना संसर्ग साथीच्या काळात आरोग्य कर्मचारी बरोबर घरोघरी जाऊन कुटुंब सर्व्हेशन केले.याबद्दल त्यांचा फलटण पंचायत समिती,गोखळी ग्रामपंचायतीचे वतीने”कोरोना योध्दा” पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल ” आदर्श माता” पुरस्कार देऊन फलटण नगरपालिका बांधकाम सभापती श्रीमती श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांचे प्रमुख उपस्थितीत लायन बापूराव जगताप यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आला.यावेळी  फलटण एज्युकेशन सोसायटीच्या जनरल सेक्रेटरी सौ. वसुंधराराजे नाईक निंबाळकर ,लायनेस क्लब अध्यक्षा सौ.निलम लोंढे पाटील,.सौ.नेहा व्होरा,सौ. सुनंदा भोसले,रिझन चेअरमन या.बाळासाहेब भोंगळे, डिस्ट्रिक चेअरमन मंगेश शेठ दोशी, फलटण नगरपालिकेच्या सदस्या सौ वैशाली चोरमारे, भोजराज निंबाळकर, डॉ.अशोक व्होरा,मनुभाई पटेल, रणजित बर्गे,हे.भ.प.एस.एम.घाडगे महाराज,ह.भ.प.पुष्पाताई कदम, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती लतिका अनपट, तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ.राजश्री कदम सविता दोशी, राजीव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विरपत्नी, वीर माता, कोव्हिड  योध्दा, आदर्श व्यवसायिका, आदर्श महिला वकील, आदर्श व्यवसायिका, आदर्श शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कार, सन्मान पत्र चे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सुत्रसंचलन सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!