जळोची:
सोमवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त त्रिवेणी आॅईल अँन्ड फुड प्रोड्क्टस यांच्यावतीने घेण्यात येत असलेला त्रिवेणी कट्टा या कार्यक्रमाचे ६ वे सदर पार पडले. स्त्री कोणत्याही क्षेत्रात अव्वल असली तरी आधुनिक जगाबरोबर आपल्या संसार फुलवत असली तरी तिच्या बालपणापासून ते तिच्या यशस्वी वाटचाली पर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी,हृदयस्पर्शी,आणि सतत काही तरी नवीन शिकन्याची उमेद देणारा असतो.याची प्रचिती “त्रिवेणी कटटा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत असल्याचे उपस्तीत मान्यवर महिलांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आपले बालपणापासून सध्याच्या यशस्वी कारकीर्द पर्यंतचे अनुभव सांगितले व महिलांनी चूल व मूल च्या पलीकडे काम करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ राणी जगताप ,
भगिनी मंडळ च्या संचालिका डाॅ सुनिता शहा,आयुष हेल्थ क्लब च्या चेअरमन सौ संगिता काकडे ,वकील संघटना च्या उपाध्यक्षा अॅड स्नेहा भापकर,नगरसेविका डाॅ सौ सुहासिनी सातव,पोलिस नाईक व निर्भया पथक प्रमुख अमृता भोईटे यांनी सहभाग दर्शवला.या कार्यक्रमाचे आयोजन त्रिवेणी ऑइल अँड फूड प्रॉडक्ट, च्या संचालिका शुभांगी वसंत चौधर यांनी केले होते.
शुभांगी चौधर यांच्या कार्यबदल व उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल या प्रसंगी सन्मान करण्यात आला.