हॉकी सब जूनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सातारच्या के एस.डी. शानभाग विद्यालयाच्या निकिता देशमुख हिची निवड.

सातारा – हरियाणा येथे लवकरच संपन्न होणाऱ्या हॉकी सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेसाठी सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज ची कुमारी निकिता देशमुख हिची निवड झालेली आहे.
 येत्या महिन्यात संपन्न होणाऱ्या या स्पर्धेसाठी निकिता सध्या इयत्ता दहावीत शिकत असूनही अतिशय कठोर परिश्रम घेत आपल्या खेळाला विशेष वाव देत आहे .तिला सागर कारंडे हे शिक्षक प्रशिक्षण देत असून मार्गदर्शन करीत आहेत. आत्तापर्यंत शानभाग विद्यालयाच्या अनेक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत केवळ खेळातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही उत्तुंग यश मिळवले असून दरवर्षी सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी या खेळाडूंची विशेष मदत होत आहे.
       निकिता देशमुख च्या या निवडीबद्दल शानभाग विद्यालयाचे संस्थापक आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग विद्यालयाच्या संचालिका सौ. आचल घोरपडे, विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनिधी ,शिक्षक, शिक्षिका तसेच कार्यालयीन कर्मचारी वृंदाने निकिताला भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
=======================
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!