बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती सायकल क्लब – महिला विभाग आणि महिला आणि बालकल्याण विभाग, बारामती नगरपरिषद, बारामती आणि एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती आणि भगिनी मंडळ, बारामती यांच्या संयुक्तिक वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वा., नटराज नाट्य मंदिर पासून सदर सायकल रॅली ची सुरुवात मिस. नेहा रमेश कोकरे ( मॉडेलिंग – मिस बेंगलोर) आणि श्री. नामदेव शिंदे – पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीस सुरुवात करण्यात आली यामध्ये ३०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला, सोबत पुरुष आणि मुलांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला असे एकूण ५०० सभासदांनी या रॅली मध्ये घेतला… सदर रॅली नटराज नाट्य मंदिर, तीन हत्ती चौकातून निघाली तर शहर परिसरातुन -एमआयडीसी पेन्सिल चौक येथून पुन्हा गुल पुनावाला गार्डन येथे झाली, येथे सदर रॅली पूर्ण करणाऱ्या सभासदांना एक सर्टिफिकेट आणि नाश्ता दिला तसेच एक छोटेखानी कार्यक्रम झाला, ज्यामध्ये काही महिलांचा आदर्श महिला म्हणून सत्कार केला ज्यामध्ये १) सौ. स्वाती शिंगाडे २) सौ. शुभांगी चौधर ३) सौ. दीपाली ठवरे ४) डॉ. स्वाती आनंद ५) अनिता खरात ६) स्वाती बेलपत्रे याना एक सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला.. या कार्यक्रमास कुमारी. नेहा कोकरे प्रमुख पाहुण्या होत्या तर आशाताई माने, डॉ. सुनीता शहा, मृदुल देशपांडे, आरती शेंडगे ,मेघा माने असे इतर प्रमुख उपस्थितांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, याचे सुत्रसंचालन सौ. संगीता काकडे तर सौ. नेहा भुते यांनी आभार मानले…
सदर सायकल रॅली बारामती नगर परिषद बारामती यांच्या माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत सर्वांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला..आणि येथून पुढे बारामती शहरास सायकलींचे शहर ओळख निर्माण करावी , असा संकल्प बारामती सायकल क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आला..