फलटणच्या न्यू विजय क्रिकेट क्लबच्या १४ वर्षाखालील मुलांनी रॉयल करंडक एकवीसवर कोरले नाव

फलटण :

फलटणच्या न्यू विजय क्रिकेट क्लब चा माळेगावच्या रॉयल क्रिकेट अकॅडमी वर दणदणीत विजय मालेगाव येथे झालेल्या अंडर फोर्टीन t20 स्पर्धेमध्ये फलटण संघाने दोन साखळी सामने आणि एक अंतिम सामना अशा तीनही सामन्यांमध्ये अपराजित राहून रॉयल करंडक एकवीस वर आपले नाव कोरले या सामन्यांमध्ये कर्णधार राजसिंह साळुंखे याने कर्णधाराला साजेशी खेळी करत दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा किताब पटकावत तीन सामन्यांमध्ये 163 धावा बनवल्या उपकर्णधार यशराज मदने याने धावा बनवल्या78 आणि 7 विके ट पटकावून कर्णधाराला योग्य अशी साथ दिली अंतिम सामन्यात विकेट किपर बॅट्समन अभिषेक कदम याने उत्कृष्ट विकेट किपिंग करण्याबरोबरच घणाघाती फलंदाजी करत 18 चेंडू मध्ये 58 धावा बनवल्या आणि अंतिम सामन्याचा मानकरी ठरला त्याच बरोबर हर्षवर्धन कदम याने सुद्धा आपल्या अष्टपैलू खेळीने संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला विनायक दळवी याने संयमी फलंदाजीचा प्रदर्शन घडवले सिद्धार्थ कुदळे या छोट्या खेळाडूने उत्कृष्ट अशी सलामी फलंदाजाची भूमिका निभावली हर्षवर्धन ठोंबरे या डावखुऱ्या गोलंदाजाने तीन विकेट पटका ऊन संघाच्या विजयासाठी हातभार लावला बिरंगी अथर्व मोरे ठोंबरे यथार्थ श्रीवास्तव यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून संघाच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली विजयी संघाला श्री सोमनाथ चौधरी यांनी मार्गदर्शन केले सामना जिंकल्यानंतर विजयी सर्व खेळाडूंनी न्यू विजय क्रिकेट क्लब चे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा निवड समितीचे सदस्य श्री मिलिंद सहस्त्रबुद्धे आणि न्यू विजय क्रिकेट क्लब चे हेड कोच इस्माईल शेख यांचे आशीर्वाद घेतले .सर्व विजयी खेळाडूंचा अभिनंदन केले

Share a post

0 thoughts on “फलटणच्या न्यू विजय क्रिकेट क्लबच्या १४ वर्षाखालील मुलांनी रॉयल करंडक एकवीसवर कोरले नाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!