सुरेश तनपुरे यांना उत्कृष्ट शोध निबंध पुरस्कार

बारामती: 
भोर तालुक्याचे सुपुत्र शिवव्याख्याते  शिवविचाराची बुलंद तोफ इतिहासकार  आणि आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकोबराय वारकरी परिषद उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य *सुरेश महाराज तनपुरे* यांचे पुस्तक *तुकोबा ते शिवबा* या पुस्तकाला  **उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार* नामांकन*शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच औरंगाबाद चे अध्यक्ष शिवश्री सुनिल सोळुंखे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.  त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन. त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह हे देऊन सन्मानित करण्यात येणार  आहे. त्यांनी या पुस्तकात लेखक म्हणून अगदी सोप्या शब्दात मांडणी केली आहे त्यांचं हे *तुकोबा ते शिवबा* पुस्तक महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचला आहे.

 सुरेश महाराज तनपुरे म्हटलं की शिव ,फुले-शाहू-आंबेडकर विचाराचा खंदा समर्थक ,छत्रपती शिवाजी महाराजांचा समानतावादी विचार घराघरांमध्ये पोहचवणारे व्यक्तिमत्व . आज  त्यांनी या कक्षा मध्ये  जे कष्ट घेतले त्या कष्टाची पावती मिळाली आहे. सुरेश महाराज तनपुरे यांचे पुनश्च अभिनंदन.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!