बारामती:आज दिनांक २१/०२/२०२१ रोजी जिल्हा क्रीडा संकुल देसाई इस्टेट बारामती येथे बारामती कराटे असोसिएशनच्या वतीने वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे फेडरेशनच्या ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन असोसिएशनच्या खेळाडू करिता करण्यात आले होते यामध्ये १२ खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट 1st दान व १ खेळाडूने ब्लॅक बेल्ट 2nd दान ची पदवी यशस्वीपणे मिळवली याकरिता सर्व खेळाडूंनी सकाळी ९ ते २.३० यावेळेत विविध कराटे प्रात्यक्षिके करीत ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट देण्यात आले
त्यांची नावे खालील प्रमाणे:-
१)श्रुती करळे,२)सिद्धी करळे,३)रोनक सय्यद,४)जय साबळे,५)ऋषिकेश मोरे,६)हर्ष भोसले,७)शुभ्रत माळवे,८)आदर्श खरात,९)फरजाना पठाण,१०)तेजस्विनी जगताप,११)अशपाक शेख,१२)अमोली पानारी तसेच आयेशा शेख हिला ब्लॅक बेल्ट 2nd दान देण्यात आला.
सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक सेन्सेई रविंद्र करळे,सेम्पई अभिमन्यू इंगुले,सेम्पई महेश डेंगळे,सेम्पई राजन शिंदे,सेम्पई ऋषीकेश डेंगळे,सेम्पई ओंकार झगडे, सेम्पई मुकेश कांबळे इत्यादीचे मार्गदर्शन लाभले यावेळी बारामती कराटे असोसिएशनचे सर्व ज्युनियर प्रशिक्षक देखील उपस्थित होते.